spot_img
spot_img

💥EXCLUSIVE जयश्रीताईंचे परखड मत.. ‘आ. गायकवाडांचे ते पोलीस विरोधी विधान खरे की खोटे? याचा खुलासा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी करावा!’ – आभार कसले? आश्वासने पाळली नाहीत..जनतेची माफी मागावी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जिल्हा दौऱ्यावर आहेत.त्यांचा ‘ आभार दौरा’ म्हणून जंगी कार्यक्रम शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने बुलढाण्यात आयोजित करण्यात आला आहे.दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी यासंदर्भात रोखठोक मत व्यक्त केले. ‘हा आभार दौरा कसला? आश्वासने पाळली नाहीत त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेची माफी मागावी’ अश्या जयश्री ताई म्हणाल्यात.

विशेष म्हणजे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांविरोधात जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्या संदर्भातही जयश्री ताई यांनी टोला लागला.त्या म्हणाल्या की,गायकवाड यांनी पोलिसांविरोधात केलेले टोकाचे विधान न पटण्यासारखे आहे.परंतु त्यांनी आपला शब्द मागे घेतला.त्यांचे आमदार पोलिसांसंदर्भात खरे बोलले की खोटे बोलले किंवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून खोटी भुमिका घेतली?यासंदर्भातील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे.शिवाय राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही.लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाची आश्वसनं पाळली नाही.पिक विमा पासून अद्यापही शेतकरी वंचित आहेत.त्यामुळे हा आभार दौरा कसला? उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!