बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अवैध रेती उत्खननाने नागरिकांचीच नव्हे तर शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांची देखील डोकेदुखी वाढविली आहे. काही अधिकाऱ्यांचे साठे-लोटे आहे हा भाग वेगळा. मात्र दुर्दैवी बाब म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात 6 जणांचा बळी गेला आहे. नेमके याच विषयावर आ. संजय गायकवाड यांनी बोट ठेवून हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.
आज 28 जून 2024 रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये बोलताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की,लोणार तालुक्यामध्ये रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याचे लक्षात आल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले होते, तसेच हे रोखण्याकरता भरारी पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती.परंतु कोणतीही कारवाई झाली नाही आणि भविष्यामध्ये आपण भरारी पथकाची नियुक्ती करणार असल्याचे म्हटले आहे, हा शब्द पाळला गेला नाही.देऊळगावराजातील खडकपूर्णा नदीतील अवैध उत्खननाबाबत अनिल चित्ते नामक तालुकाध्यक्षाने मुख्यमंत्री महोदय व आयुक्त यांच्या मार्फत जी चौकशी केली होती त्या चौकशीचा अहवाल शासनाकडे गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहे.महसूलचे कक्ष अधिकारी व उपसचिव यांनी जाणीवपूर्वक हा अहवाल दाबला हे खरं आहे का आणि असल्यास त्यावर मंत्री महोदय काय कार्यवाही करणार? असा आक्रमक प्रश्न आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन सुरूच असून आतापर्यंत रेती तस्करांनी 6 बळी या सर्वांनाच रेतीमाफीया यांनी चिरडून ठार केले. याची चौकशी करून त्या संबंधितावर आतापर्यंत काय कारवाई केली, किंवा काय कारवाई करणार आहात याचा खुलासा करणार का..? असाही रोखठोक प्रश्न यावेळी मांडण्यात आला.
खडकपूर्णा नदीवरील संपुर्ण घाट कोणताही लिलाव न करता खुलेआम रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे, तातडीने झालेल्या उत्खननाचे मोजमाप करून त्याच्यावर काय कारवाई करणार आहात? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.या विषयाशी संलग्न प्रश्न उपस्थित करताना आ.गायकवाड यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 41 रेती घाट पर्यावरण विभागाकडे परवानगीसाठी गेले आहेत. त्याची तातडीने आपल्या स्तरावर बैठक लावून त्यांना परवानगी देणार का? यासह
जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नावर उत्तर देताना महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,
आम.गायकवाड यांनी उपस्थित केलेले प्रश्न लवकरच निकाली निघणार असून, त्याचा अहवाल तातडीने मागवून त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार तसेच संबंधितांना सूचना केली जाणार आहे.अवैध वाहतुकीमुळे जो निरअपराध लोकांचा मृत्यु होतो त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनांना कठोर कारवाईच्या सूचना दिली आहे. परंतु खडकपूर्णाच्या बाबतीमध्ये जो महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे त्या बाबतीत नक्कीच योग्य ती कारवाई केली जाईल, असा विश्वास ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.














