लोणार (हॅलो बुलडाणा – यासीन शेख) संपूर्ण स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन फोरजी मशीन प्राप्त झाल्या आहेत परंतु दुकानदारांच्या इत्यादी बाकी राहिलेल्या मागण्यांवर शासनाकडून आजपर्यंत कुठलाही निर्णय होताना दिसत नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुकानदारांच्या आशेची निराशा होताना दिसून येत आहे.
यासाठी आज दिनांक २७ जून रोजी सकाळी ११ वाजता लोणार तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून तहसील कार्यालय लोणार येथे धरणे आंदोलन करण्यात येवून दुकानदारांकडून निवेदन तहसीलदार जोशी साहेब यांना दिले व निवेदनाची प्रतिलिपी आमदार संजय रायमुलकर तसेच केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांना सुद्धा दिले.
निवेदनात नमूद असल्याप्रमाणे आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारने दुकानदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष द्यावे अन्यथा २ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असून ८ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार असल्याचे संघटने कडून सांगितले.
4G मशीन प्राप्त माञ सर्व्हर डाऊन!
स्वस्त धान्य दुकानदारांना नवीन फोरजी मशीन प्राप्त झाल्या असल्यातरी सर्व्हव डाऊन मुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. मशीन फोरजी आल्या पण आता सर्व्हर डाऊनमुळे तासनतास स्वस्त धान्य दुकानावर बसून नागरिकांना सरवरची वाट बघावी लागत आहे.