spot_img
spot_img

भुसावल नागपूर दरम्यान च्या सर्व गाड्यातील स्लीपर कोच व जनरल कोच वाढणार

मलकापूर  (हॅलो बुलडाणा – करण झनके) भुसावल नागपूर दरम्यान च्या सर्व गाड्यातील स्लीपर कोच व जनरल कोच वाढणार रेल्वे अधिकाऱ्यांचे संकेत

याबाबत अधिक असे की भुसावल विभागाच्या मंडळ रेल्वे उपयोग करता सल्लागार समिती म्हणजे डी आर यु सी सी DRUCC ची 172 मी बैठक भुसावल येथे दिनांक 26/06/24 ला संध्याकाळी पार पडली यातDRUCC मेंबर अड महेंद्र कुमार बुरड यांनी गेल्या अनेक महिन्यापासुन रैलवे प्रशासन फक्त एसी प्रवाशांची सुविधा पाहत आहे व जनरल प्रवाशांची गर्दी आरक्षित डब्यात होत आहे व प्रवाशांना नरक यातना भोगाव्या लागत आहे विशेष अमरावती मुंबई, विदर्भ एक्सप्रेस मध्ये एसी डब्बे कमी करून आरक्षित व अनारक्षित डबे वाढविणे जरुरी आहेत याबाबत रेल्वे प्रबंधक(DRM) इती पांडे यांनी सकारात्मक राहून येत्या काही दिवसात खुशखबर येईल असे संकेत अड बुरड यांना बैठकीत दिली
यापैकी मलकापूर येथील लिफ्ट चे काम लवकर व्हावे विकास कामांची गुणवत्ता व गती आत सुधार . मलकापूर ,नांदुरा, शेगाव येथील विविध समस्या लवकरात लवकर सोडवण्याची आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले तसेच मलकापूर येथे सरकते जिन्याची मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी विविध सदस्यांनी आपल्या समस्या मांडल्या यावेळी रेल्वेचे विविध अधिकारी उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!