बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला, माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला, मला ईडी,सीबीआयच्या नोटीस आल्या असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून विधानपरिषदेत जोरदार राडा करण्यात आला होता.दरम्यान या पार्श्वभूमीवर बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील अनिल परब यांचा सडेतोड समाचार घेतला आहे.’ अनिल परबचे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले की,छत्रपती संभाजी महाराजांशी स्वतःची तुलना करायची अनिल परबची लायकी नाही.छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य,धर्मनिष्ठ त्यांची स्वराज्यनिष्ठा यात परब कुठे लागतो? महाराजांच्या पायाच्या धुळीची ही परब बरोबरी करू शकत नाही.अबू आजमी अनिल परब सारखे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महापुरुषांना नाव ठेवतात त्यांची विटंबना करू पाहतात..एक प्रकारची साखळी मनात चालली असून हे बेशरम लोक असल्याचे गायकवाड म्हणाले.