spot_img
spot_img

💥चूक नडली! कपाटातून 1,11,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास! – चोरांना पोलिसांची भिती उरली नाही!

मेहकर (हॅलो बुलडाणा) कधी कधी आपण स्वतः केलेली चूक आपल्याला महागात पडते. लोखंडी कपाटात पैसे आणि दागिने ठेवून त्याची चावी कपाटाच्या बाजूने ठेवणे एका महिलेला चांगलेच भोवल्याची घटना 6 मार्चला सकाळी 10 ते 2 वाजता च्या दरम्यान मिलिंद नगरात समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकुण तब्बल 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करून पोबारा केला आहे.

मेहकर परिसरात चोरीचे सत्र सुरूच आहे.चोरट्यांना पोलिसांची भीती उरली नाही. येथील मिलिंद नगरात वार्ड क्रमांक 16 मध्ये सौ नंदा करण गाढवे ह्या राहतात.6 मार्च रोजी सकाळी 10 ते 2 दरम्यान त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाच्या बाजूने ठेवलेली चाबी घेऊन कपाटाचे लॉकर उघडले. लॉकरमधून अंदाजे पंधरा वर्षापुर्वीचे 01 तोळा वजनाची सोन्याची पोत ज्यामध्ये दोन ग्रॅमचे पॅण्डल व 8 ग्रॅमचे सोन्याचे गहुमणी किंमत अंदाजे 30,000 रु. व तीनचार वर्षापुर्वी खरेदी केलेली सोन्याची अंगठी वजन 3.5 ग्रॅम किंमत अंदाजें
21,000 रु. तसेच तेरा वर्षापुर्वी खरेदी केलेले सोन्याचे कानातील झुंबर व वेल वजन 01 तोळा किंमत 30,000 रु. आणि तेरावर्षापुर्वी खरेदी केलेले एक सोन्याचे कानातले झुंबर जोड वजन अंदाजे 05 ग्रॅम किमती अंदाजे 15,000 रु. तसेच नगदी 15,000 रुपये असा एकुण 1,11,000 रुपयांचा मुददेमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. सौ. गाढवे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!