बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना शिंदे गट व्यापक करण्यावर भर देत व काँग्रेसला धक्का देण्यात आमदार संजय गायकवाड यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. कारण आज ६ मार्च रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचे दिग्गज नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विजय अंभोरे, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा समन्वयक तथा काँग्रेसचे नेते श्री ऍडव्होकेट गणेशसिंग राजपूत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट श्री विजयसिंह राजपूत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेवादल उपाध्यक्ष श्री गजाननदादा लांडे पाटील या दिग्गज नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.यावेळी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.