बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धामणगाव बढे येथील नागरिक बऱ्याच वर्षापासून विजेच्या त्रासामुळे हैरान आहेत. परिणामी हा प्रश्न निकाली लागावा म्हणून आम.संजय गायकवाड यांना अरमोड केबल द्वारे अंडरग्राउंड विद्युत लाईनची व्यवस्था करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
वादळी पावसामुळे विद्युत लाईनचे तार तुटून पडतात. हि विद्युत लाईन मोताळा सब स्टेशनवरून जुळलेली आहे.विद्युत तारा हे रोडच्या बाजूनेच आहे.त्यामुळे वारा,वादळ, पावसामुळे रोड वरील झाडे तुटून तारावर पडतात. त्यामुळे 20 – 20
तास लाईन येत नाही.वायरमन लोकांना फॉल्ट लवकर सापडत नाही. परिणामी
ग्रामस्थांना दिवसभर तर कधी कधी रात्रभर अंधारात राहावे लागते.विद्यार्थ्यांच्या
परीक्षेच्या वेळेस सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होते.या गावाची लोकसंख्या 15 ते 20 हजार आहे पूर्वीच्या डीप्या या 100 वॅटच्या असल्यामुळे व सध्याचा भार दुपटीने वाढल्यामुळे बारबार डीप्या जळणे, फ्युज उडणे तसेच शॉर्ट सर्किटच्या घटना वाढल्या आहे. याकरिता या गावासाठी 10 ते 15 डीप्या 200 वॅटच्या नवीन देण्यात याव्या तसेच गावाची लोकसंख्या पाहता याठिकाणी 5 वायरमनच्या जागा रिक्त असून या जागा भरण्यात याव्या.मोताळा ते धामणगाव बढे पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आरमाड केबल ( अंडरग्राउंड ) जमिनीतून टाकून विद्युत पुरवठा धामणगाव बढे या गावाला
करण्यात यावा व लाईनच्या त्रासातून सुटका व्हावी, अशी मागणी शेख हारून शेख यासीन,ओमप्रकाश भागवत बजे,प्रमोद ओंकर राऊत, सादीक बिसमिल्लाहू शेख,स्वर दिनकर सोनुने,सचिन पुरषोत्त्म गोरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.