spot_img
spot_img

बोगस एन.ऐ.! श्री समर्थ नगरवासीयांच्या पायाखालची जमीन सरकली!-लोणार येथे झाली सर्वसामान्यांची फसवणूक

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बोगस बीन शेती दाखला (एन.ऐ.) तयार करून सर्वसामान्यांची फसवणूक होतअसल्याचे प्रकार काही नवे नाहीत. लोणार शहरातील श्री समर्थ नगर ले आऊट देखील बोगस असून, येथे राहणाऱ्या रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे.

लोणार शहरातील श्री समर्थ नगर भाग 2 शिवारा मधील सर्वे नं. 221 मधील 11 एक्कर 23 गुंठे जमीनी पैकी बेकायदेशीर अकृषक आदेश अप्पर आयुक्त अमरावती यांनी अखेर प्रश्नाकित करून रदद केले आहेत. लोणार भाग -2 शिवारातील सर्व्हे नं. 221 मधील कुळांना मिळालेली जमीन कुळांनी तत्कालीन महसुल कर्मचारी व अधिकारी यांना हाताशी धरून बेकायदेशिर खरेदी, विक्री व्यवहार केला.सदरची जमीन
तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी 32
पानी अहवालात सदरील जमीन कुळाची नाही म्हणुन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवुन कुळाची वर्ग 2 जमीन असतांना जमीन वर्ग 1 दाखविली. दरम्यान बेकायदेशीर एन. ए. पी.34 अकृषक आदेश करून अकृषक केलेली जमीनीची प्लॉटींग व्दारे विक्री देखील केली.
वास्तविक जमीन ही कुळाची वर्ग 2 असतांना शासनाची व मुळमालकाची फसवणूक करून बेकायदेशिरपणे प्लॉटींग विक्री करण्यात आली आहे.सदर प्रकरणातील मुळ मालक आनंद वालकडे यांचे कुळमुखत्यार किरणकुमार नेमीचंद संचेती यांनी आयुक्त
अमरावती यांच्याकडे अपिल दाखल करून कुळाच्या जमिनीची
बेकायदेशीर विक्री प्रकरणी व बेकायदेशीर अकृषक आदेश रदद
करण्यासाठी अपिल दाखल केली. दरम्यान अप्पर आयुक्त अमरावती यांनी सर्व्हे नं. 221 मधील जमीनीतील बेकायदेशीर असलेले एकुण 4 वेगवेगळे अकृषक आदेश रदद केलेले आहे.त्याबाबत तत्कालीन महसुल कर्मचारी व लेआऊट मधील रहीवासी यांच्यात संभ्रम निर्माण झालेला आहे. तसेच नगर
पालीका लोणार यांनी सदरच्या आदेशाची दखल घेऊन सदरील
जमीनीतील बेकायदेशीर बांधकामाची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारदार किरणकुमार संचेती यांनी केली आहे. लोणार शहरातील भाग-1 व भाग- 2 शिवारातील
शासकीय ई क्लास तसेच कुळाच्या जमीनीच्या जुने रेकॉर्ड व आज रोजीच्या रेकॉर्डची पाहणी केल्यास बरेच प्रकरणे अंदाजे 35
वर्षापुर्वी असलेल्या तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी
शासकीय जमीनीच्या दस्तऐवजात शासनाची दिशाभुल करून हेराफेरी झाल्याचे सिध्द होणार असल्याचे निदर्शनसा येणार आहे.याचीही चौकशीची मागणी तक्रारकर्ते संचेती यांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!