spot_img
spot_img

💥अपघात! महामार्गावर वाळू माफिया ठरताहेत यमदूत! – वरुड बु.ते जाफ्राबाद जालना रस्त्यावर भयंकर अपघातात 3 जण जखमी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा/संदीप मापारी) रस्त्या रस्त्यावर यमदूत बसलेला आहे.तो कधी कुणाला जवळ बोलावील याचा नेम नाही.वरुड बु ते जाफ्राबाद रस्त्यावर सोनखेडा फाट्याजवळ १ मार्चला एक टिप्पर आणि मोटारसायकल मध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले.टिप्परच्या वाळूखाली दबून पाच व्यक्ती मृत्यू झाल्याची घटना याच तालुक्यातील वाळू माफियाच्या ग्रुप मधील असल्याचे कळते.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी व्यक्ती सोनाटी (ता. मेहकर) येथील रहिवासी असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली पण त्यातील अरबाज सत्तार पठाण जागीच ठार झाला असून पंकज दिलिप बदर , आदिनाथ मनोहर जाधव जबर जखमी झाले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, हे सर्व राहणार सोनाटी ता. मेहकर जि .बुलढाणा प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या असून, वाहनचालकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील वाळू माफियाकडून बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील महसूल विभागाला लाखो रुपयाचे पॅकेज मिळत असल्याची गुप्त माहिती असून हा रात्रीचा खेळ सुरु आहे. सदर अपघात प्रकरण दडपण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शंका अपघातातील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी व्यक्त केलीय.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!