spot_img
spot_img

💥लक्षवेधी सोहळा! ‘देवा तुझा मी सोनार.. तुझे नामाचा व्यवहार!’ – संत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. या संताची बुलढाण्यात पुण्यतिथी साजरी झाली. सोनार समाज संघटीत व्हावा व आपआपसात स्नेह, प्रेम, सहानुभुती, आत्मीयता व एक संघतेची भावना वृध्दींगत व्हावी या हेतुने दरवर्षी प्रमाणे यंदाही संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

नुकतीच संत शिरोमणी महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम बुलढाणा येथील सोनार समाजाचे नरहरेश्वर महादेव मंदिर क्रीडा संकुल रोड तोमाई शाळा बुलढाणा येथे संपन्न झाला. कार्यक्रम सोनार समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बुलढाणा सोनार समाजाचे अध्यक्ष श्रीराम राजाराम उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. महाराजांच्या पूजेचा पहिला मान हा श्री व सौ मोरेश्वर खिरोडकर जोडप्यांना मिळाला. उपस्थित समाजातील 6 जोड्यांचे हस्ते सुद्धा पूजन करण्यात आले.याप्रसंगी मोहनरावजी शहाणे, मोरेश्वरजी खिरोडकर, सुधाकर जी पळसकर, सुनीलजी तळेकर,विश्वनाथ ठोसर,निलेशजी रत्नपारखी,अमोल करे,प्रदीप तारापुरे,आशिष उज्जैनकर, रवींद्रजी घुसळकर आदी बांधव उपस्थित होते.

▪️दात्यांनी दिली देणगी!

कार्यक्रमांमध्ये निलेश प्रल्हाद रत्नपारखी यांचे छोटे बंधू शैलेश प्रल्हाद रत्नपारखी राहणार मुंबई यांनी संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त नरहरेश्वर महादेव मंदिराला 21 खुर्च्या मंदिरात भेट दिल्या व महिलामध्ये पवन महिला बचत गट ने विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसाठी 6000 रुपये व विजया श्रीराम उज्जैनकर यांनी 15000 रुपये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसाठी नरहरी चरणी अर्पण केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!