spot_img
spot_img

💥ऑपरेशन टायगर! ना. एकनाथ शिंदेंची खेळी! – केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी शिजली खिचडी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत कार्यकर्ता…. कधीच ठाकरेंना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या रत्नागिरीच्या राजन साळवींनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय.सत्तासंघर्षाच्या काळात एकनाथ शिंदेंची ऑफर धुडकावून ठाकरेंसोबत ठाम राहिलेल्या राजन साळवींनी आज हे पाऊल उचललं ..याचं कारण असं की, ना.एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरू केलंय!

बुलढाण्यातील केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर तसेच खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे स्नेहभोजनासाठी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संजय दीना पाटील देखील एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्काराला उपस्थित असल्याचे
समोर आले आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला यावरुनही उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना झाले असून ते आज आपल्या पक्षाच्या खासदारांची बैठक घेणार आहेत. ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत ते राहुल गांधी यांच्या सह इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान ऑपरेशन टायगर मध्ये काही मासे गळला लागले तर उत्तर महाराष्ट्र,व मराठवाड्यातील दोन-तीन खासदारांनी नकार दिल्याने ऑपरेशन बारगळल्याचे म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!