बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्नेहल संदीप चौधरी या युवतीच्या 10 फेब्रुवारी रोजी अपघाती निधनाची दुदैवी बातमी धडकली अन् समाजमन सुन्न झाले.आज सायंकाळी 6 वाजता चांडक लेआउट ते त्रिशरण चौक कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.दरम्यान आज स्नेहलताई उद्या कोण?, सरकार कोणासाठी?,निर्दोष मरतात गुन्हेगार मोकाट फिरतात..हे अन्यायाचं राज्य आहे का?असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असूनही, लोकांना कायद्याचा आदर किंवा भीती नसल्याने मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे.अपघातांच्या घटनांना ब्रेक लागत नाही,हे दुर्दैव आहे. त्रिशरण चौकात अपघात झाला आणि या अपघातात एक 24 वर्षीय मुलगी गतप्राण झाली.
या मुलीचे नाव शितल संदीप चौधरी असे आहे.एका बोलेरो गाडीने मुलीचा जीव घेतला.मुली सोबत तिची आई सुद्धा गंभीर जखमी झाली होती.दरम्यान आज सायंकाळी सहा वाजता चांडक लेआउट ते त्रिशरण चौक दरम्यान कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.