बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील धामना नदी पात्रातुन वाळू उपसा व वाहतुक करण्याच्या वादातुन आरोपी वैभव ज्ञानेश्वर भोपळेने एकाच्या डोक्यात लोखंडी टामीने प्रहार करुन जागीच ठार केले व पुरावा नष्ट करण्यासाठी सांडलेल्या रक्तावर
पवन ज्ञानेश्वर बकाल याने जेसीबीच्या साह्याने माती, रेती लोटुन मृतदेह धामणानदीच्या पुलाखाली टाकुन दिला.याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदर गंभीर घटना बुलढाणा तालुक्यातील ईरला गावानजीकच्या धामणा नदीच्या पात्रात 6 फेब्रुवारी रोजी रात्री 2 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली होती.मृतक उमेश साहेबराव फदाट वय 35 वर्ष रा.बोरगाव फदाट ता.जाफ्राबाद जि.जालना याची गावातीलच आरोपी वैभव ज्ञानेश्वर भोपळे व पवन ज्ञानेश्वर बकाल यांनी जेसीबी मशीन मधुन लोखंडी टामी काढत उमेशच्या डोक्यात लोखंडी मारले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.अशी तक्रार मृतकाचा भाऊ राहुल फदाट यांचे फीर्यादी वरुन खुनाचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना काल अटक करून आज बुलढाणा कोर्टात हजर केले असता आरोपींना 13 फेब्रुवारी पर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती धाडचे प्रभारी ठाणेदार जयसिंग राजपूत यांनी आज 9 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता दिली आहे.