बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे ७ फेब्रुवारी रोजी भव्य सभासद नोंदणी अभियान व युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.या मेळाव्यासाठी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ॲड. नझीर काझी यांसह अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. राजीनाम्यांचे सत्र, पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोप, आणि बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
युवकांची संघटन बांधणी व त्यांच्या भूमिकेला ठाम दिशा देण्यासाठी आयोजित या मेळाव्यात पक्षाच्या भविष्यातील मार्ग ठरवला जाणार आहे. विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा निर्धार या मंचावर होणार असल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.जिल्ह्यातील युवकांना एकत्र आणणाऱ्या या महत्त्वाच्या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमातून पक्षाला बळ मिळेल, तसेच हा मेळावा राष्ट्रवादी युवक काँग्रेससाठी टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता व्यक्त होतेय.