बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील तरुणांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (‘यिन’) च्या जिल्हाध्यक्षपदी पवन श्रीकृष्ण खवले यांची निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
पवन खवले यांनी शेकडो युवकांचे प्रतिनिधित्व करत महाविद्यालयीन निवडणुकीत प्रभावी विजय मिळवला. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळेच ‘यिन’ चळवळीमध्ये त्यांची निवड तरुणांच्या मनातील निवड असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रातील ‘यिन’ प्रमुख श्यामसुंदर माडेवार यांनीही त्यांच्या या निवडीचे स्वागत करत भविष्यात अधिक सक्रिय राहण्याचा सल्ला दिला.या गौरवपूर्ण क्षणी मा.नगरसेवक आकाश दळवी, उद्योजक टिल्लू गोरले आणि मित्र परिवार यांनी पवन खवले यांचे विशेष अभिनंदन केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘यिन’ चळवळ बुलडाणा जिल्ह्यात नवा उच्चांक गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे