बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नाहरकत प्रमाणपत्र दिले आणि पाहिजे असलेला विजेचा खांब उभारला नाही म्हणून चक्क तो खांबावर चढून त्यांनी उपोषणास्त्र उपसले!
विलास दत्तूजी चर्जन रा. सोनोरी, ता.चांदुर.बा यांनी उद्धव रंगरावजी चर्जन यांचे घरासमोरील रस्त्याचे मधोमध असलेला इलेक्ट्रीक पोल बाजूला करावा म्हणून म. रा. वी. वी. कंपनी यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले असून अजून पर्यंत इलेक्ट्रीक पोल बाजूला केला नाही. म्हणून 27 जानेवारी रोजी 9.30 वा. पासून इलेक्ट्रीक पोल वर चढून उपोषणास बसला आहे.याकडे संबंधित यंत्रणेची दुर्लक्ष दिसून येत आहे.