बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहपूर्ण रविवारी साजरा होणार आहे.या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जातील.त्यामध्ये साई दंत रुग्णालयाकडून गरजू रुग्णांसाठी मोफत दंत चिकित्सा व औषधोपचार शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या २३ वर्षां पासून राष्ट्रीय सण व महापुरुषांच्या जयंती निमित्त साई नंतर रुग्णालयाकडून सामाजिक उपक्रमांतर्गत मोफत चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात येते. यंदा २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सदर शिबिर हे जिजामाता क्रीडा संकुलाच्या दुकान क्रमांक ५ या साई दातांच्या दवाखान्याच्या नवीन जागेत होणार आहे. सदर शिबिरात दवाखान्याचे संचालक डॉ. प्रकाश अंभोरे हे दंत रुग्णांची तपासणी करणार असून त्यांना एक्सरे पासून तर आवश्यक औषधींपर्यत सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन मुख व दंतरोग तज्ञ डॉ. प्रकाश अंभोरे यांनी केले आहे.