spot_img
spot_img

💥भीषण! समृद्धीवर पुन्हा ‘झोपेची डूलकी!’ -एक ठार; एक गंभीर!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा / संतोष जाधव) मृत्यूचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर 18 जानेवारी रोजी चॅनल क्रमांक 336.8 मुंबई कॉरिडोरवर एक भीषण अपघात झालाय.हा अपघात कार व ट्रकमध्ये झाला असून एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

कार क्रमांक MP-28-CB-9530 चा चालक श्रव मेलानी वय 20 राहणार नागपूर, हे आपल्या मित्रासोबत नागपूर वरून संभाजीनगर कडे जात असताना कारचालकाला झोपेची डुलकी लागल्याने कार अनियंत्रित होऊन समोर जात असलेला ट्रक क्रमांक MH-12-UM-3433 चे चालक वैभव रावसाहेब व्यवहारे वय 28 रा. कवडीपाट, लोणी काळभोर, ता. हवेली,जिल्हा पुणे हे इमर्जन्सी लेनवर आपले वाहन चालत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या चालकाला झोपेमुळे समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने पाठीमागून उजव्या साईडच्या टायर जवळ कार धडकली व कार पुन्हा मिडीयम मधील बॅरियरला धडकून यामध्ये ड्रायव्हर च्या बाजूला समोर बसलेले कार मधील सुजोग सोनी वय 20 वर्ष रा. नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले आयुष जैन वय 20 वर्ष रा. नागपूर हा गंभीर जखमी झाला. व चालक किरकोळ जखमी झाला. त्यांना तात्काळ समृद्धी महामार्ग ॲम्बुलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे,डॉक्टर यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे, व शैलेश दळवी यांनी जागेवर प्रथम उपचार करून पुढील उपचार कमी जालना येथे घेऊन गेले तसेच,समृद्धी महामार्ग QRV टीमचे कैलास आघाव, श्रीकृष्ण बच्छीरे, इंगोले ,गोपाले, कराळे ,अभिषेक काणेकर व पवार या सर्वांनी अथक प्रयत्न करून मृतक व जखमी यांना वाहनाच्या बाहेर काढले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!