spot_img
spot_img

💥EXCLUSIVE! आमदारांना डावलणं ग्रामसेवकाला चांगलंच भोवलं! – गटविकास अधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस, प्रशासनात खळबळ! – पांगरखेड उद्घाटन प्रकरणी प्रशासनाचा गोंधळ, काय होईल पुढे?

मेहकर (हॅलो बुलडाणा) पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पांगरखेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सागर डी. काळे यांनी विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण न देता ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन माजी आमदारांच्या हस्ते केल्याने वाद उफाळला आहे. गटविकास अधिकारी, पंचायत समिती मेहकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या १७ जानेवारी २०१४ च्या परिपत्रकानुसार ग्रामसेवक काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शासकीय परिपत्रकानुसार, कोणत्याही लोकोपयोगी विकासकामांच्या उद्घाटनावेळी स्थानिक आमदार व लोकसभा सदस्यांना आमंत्रित करणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात आमदार खरात यांना डावलल्यामुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ग्रामसेवक काळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये तीन दिवसांत लेखी उत्तर देण्याचा आदेश दिला असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाच्या नियमांतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. अनधिकृत उद्घाटन कार्यक्रमांमुळे निर्माण झालेल्या या वादग्रस्त परिस्थितीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाची पुढील कारवाई ग्रामसेवक काळे यांच्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.लोकप्रतिनिधींना डावलण्याच्या घटनांवरून प्रशासन आता अधिक कठोर भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!