देऊळगाव घुबे (हॅलो बुलडाणा) चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे परिसरातील वन्य प्राण्यांने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. शेतपिकांवर झडप घालून वन्यप्राणि पिकांची नासाडी करीत असल्याने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी ऐरणीवर आली आहे.
रात्री वन्य प्राणी रोही पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत असल्याने वारंवार वन विभागाकडे तोंडी फोन द्वारे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तरी काही फरक पडत नाही.मग हातातोंडाशी आलेला घास जर वन्य प्राणी हिसकून घेत असेल तर मग शेतकऱ्यांनी जगावे कसे?
हजारो रुपये खर्च करून महागडे बियाणे, खते खरेदी केले व काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीसाठी बियाणे, खते, औषधी खरेदी केली व शेतकऱ्यांनी पेरणी केली.आता अंकुर जमिनीतून बाहेर निघाले असून, अंकुर पिकांची वाढ होत असताना व काही पिके काढायला सुरुवात झाली आहे,वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करीत आहेत.
▪️ शेतकरी गजानन शेषराव घुबे म्हणतात..
‘आम्ही कर्ज काढून शेती पिकासाठी पेरणी केली आहे.त्यात कधी कधी निसर्ग हिरावून घेतो तर कधी वन्य प्राणी शेतमालावर शेकडो रोहयाचे कळप पिकावर झडप घालतात. त्यामुळे पिकाचे नुकसान होते.या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त केला पाहिजे.