spot_img
spot_img

डोळ्यांचे पारणे फेडणारा जन्मोत्सव! – आज “जीजाऊ गाथा!” – ‘माँ जिजाऊ नगरी दुमदुमणार!’ – सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी,नंदेश उमप यांची हजेरी! – नागरिकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा : एसडीओ प्रा. संजय खडसे यांचे आवाहन!

देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) दि.12 जानेवारी रोजी राजमाता जीजाऊ यांची जयंती साजरी केली जाते.दरवर्षी प्रमाणे दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी राजमाता जीजाऊ यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन त्यांचे जन्मगाव सिंदखेड राजा येथे करण्यात आलेले आहे.

राजमाता जीजाऊ भक्तांना त्यांचा जीवन पट माहिती व्हावा,माँ जीजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर केलेले संस्कार व स्वराज्य स्थापनेत त्यांचा असलेला सिंहाचा वाटा याबाबत विषेश कार्यक्रमाद्वारे नागरीकांना या गोष्ठी माहीती व्हाव्यात याकरीता सांस्कृतीक कार्य विभागाद्वारे आयोजीत व जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व नगर परीषद प्रशासन विभाग यांचे विशेष सहकार्याने दिनांक 10 व 11 जानेवारी रोजी सायं.6.30 ते रात्री 10.00 पर्यंत “जीजाऊ गाथा महोत्सवाचे” आयोजन श्री.लखुजीराजे जाधव राजवाडा (राजमाता जीजाऊ जन्मस्थळ) परीसर,सिंदखेड राजा जि.बुलढाणा येथे होणार आहे.10 जानेवारी रोजी जीजाऊ वंदन, महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होणार असुन प्रसिध्द सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व 100 कलाकारांचा समुह यामध्ये सहभागी होणार आहे.तसेच दिनांक 11 जानेवारी,2025 रोजी महाराष्ट्रातील प्रसिध्द गायक नंदेश उमप यांचा कार्यक्रम होणार आहे.दिनांक 10 व 11 जानेवारी रोजी होणारा जीजाऊ गाथा महोत्सवाचा कार्यक्रम विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे.या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरीकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सांस्कृतीक कार्य विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा व नगर परीषद प्रशासन विभागाचे वतीने करण्यात येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!