बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभा निवडणुकीच्या जय पराजयामुळे ‘आग ही आग’ अशी परिस्थिती आहे.अशातच सिंदखेड तालुका मोताळा येथे मीयावाकी पद्धतीने 2100 विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलेल्या जंगलात आग लागली आणि वृक्षांच्या मुळाशी आच्छादनासाठी 7 टन गवताला आग लागली. यावेळी मोठे नुकसान झाले. दरम्यान महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली.
आग ही आग! पण ही आग कोणती? – जयश्रीताई शेळेकेंनी केली पहाणी!
मियावाकी ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड केली जाते. मियावकी
वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातीची त्यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते आणि हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे. येथे विदेशी वृक्षांना स्थान नसते. सर्व तंत्रज्ञान जमिनीखालील उपयोगी जिवाणू, खेळती हवा, शेणखत आणि भाताच्या तुसावर अवलंबून असते.
याप्रकरणी जयश्री शेळके यांनी भेट दिल्यानंतर आज धा. बढे पोलीस स्टेशनंचे ठाणेदार नागेश जायले व त्यांचे सहकारी येऊन पाहणी करून पंचनामा केला. दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केल्या जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान आग लावली की लावण्यात आली? हा प्रश्न चर्चेत आहे.