बुलढाणा (हॅलो बुलडाणा) या वर्षात लाचखोरी मध्ये महसूल विभाग पुढे आहे.याच महसुली भागातील महा भ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे ‘ ऊसातून जातो पण पानं लागू देत नाही’ असा आहे.या भ्रष्टाची नुकतीच पटवारी-मंडळ अधिकारी महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.दरम्यान या निवडीबाबत अर्थपूर्ण घडामोडी घडल्याची चर्चा होत आहे.
विजय दत्तात्रय टेकाळे यांनी गेल्या २५ वर्षांत महसूल विभागात प्रचंड भ्रष्टाचाराचा चिखल केलेला आहे.लोकांच्या लुबाडणुकीचे तसेच फौजदारी कारवाईसंदर्भातल ठोस पुरावे आहेत.
तलाठी पटवारी मंडळ अधिकारी महासंघाला बेबंदपणे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वावडे नाही काय? किंवा टेकाळेंनी यासाठी महासंघावर दबाव आणला का? किंवा काही अर्थपूर्ण घडामोडी घडल्या का, असे प्रश्न निर्माण होत आहेत. टेकाळे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते.त्यांनी शासनाच्या सेवाशर्तीचा तर न्यायालयाचे आदेशाचा देखील भंग केलेला आहे.या महाप्रतापी टेकाळेची राज्याध्यक्षपदी नियुक्ती होणे म्हणजे भ्रष्टाचाराला वाव देणे आहे असे म्हटले जात आहे.
भ्रष्टचाराचे पुरावे आम्ही संबंधितांकडे दिलेले आहे…
महसूल विभागातील महाभ्रष्टचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांची बुलडाणा एसीबी कडून गोपनीय चौकशीत अर्धेशतकाच्या वर सातबारे मिळाले असून खुल्या चौकशीत जवळपास पूर्ण शतकांच्या वर भ्रष्टाचारातून कमावलेली अवैध संपत्तीचे सातबारे व अधिकाऱ्यांच्या कारवाईचे पत्र सिटी न्यूज वृत्तवाहिनीने बुलडाणा एसीबीकडे सुपूर्त केले आहे.
आरसा…