बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्यभर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असून आज बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या विषयी आपले परखड मत व्यक्त केले. या नृशंस हत्याकांडात ना. धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असल्याचे सांगत, गुन्ह्याची पाळेमुळे खोदल्या गेली पाहिजे, असा त्यांनी सूर आवळला आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात 942 तर बीडमध्ये 1222 बंदुकीचे परवाने असून, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कंट्रोल नसल्याचेही सांगितले.
आज 28 डिसेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. बीड हत्याकांड प्रकरणी प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे सांगितले.बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांना जबर मारहाण झाल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण पेटले असून न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. मारहाणीमुळे शरिरातून अतिरक्तस्त्राव झाला. शॉकमध्ये गेल्यामुळे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला, असा उल्लेख शवविच्छेदन अहवालात करण्यात आला आहे. यासह संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांची छाती, डोकं, हात-पाय, चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली आहे. चेहरा, डोळ्यांचा भाग मारहाणीमुळे काळा-निळा पडला होता. संतोष देशमुख यांचा मृत्यू हॅमरेड अॅण्ड शॉक ड्यू टू मल्टिपल इन्जुरिजमुळे झाला आहे.त्यामुळे पूर्ण राज्य पेटून उठले आहे.हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला.दरम्यान बुलडाणा आमदार संजय गायकवाड म्हणाली की,या प्रकरणातील आरोपी सुटणार नाहीत.त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई होणार आहे.वाल्मिकी कराड हा खंडणीखोर आरोपी ना.धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे.तसा उल्लेखही ना. पंकजा मुंडेंनी भाषणातून यापूर्वी केलेला आहे.वाल्मिकी कराड याने दोन करोड रुपयांची खंडणी मागितली होती यातूनच हा मर्डर झाला असल्याचे आ. गायकवाड म्हणाले.बीड जिल्ह्यात वाल्मिकी कराड यांच्या नावावर मागील गुन्हे आता पोलीस रेकॉर्डवर नाहीत. या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.बुलढाणा जिल्ह्यात 942 बंदुकीचे परवाने देण्यात आले तर एकट्या बीड जिल्ह्यात 1022 बंदुकीचे परवाने असल्याचेही गायकवाड म्हणाले.सन 1992 मध्ये एका आयएएस अधिकाऱ्याला एका नेत्यांच्या घरातून गायब करण्यात आले होते.तो आतापर्यंत कुठे आहे ते आजही माहीत नाही.