देऊळघाट (हॅलो बुलडाणा) राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस चालकांना झाले तरी काय? काही दारुडे चालक नागरिकांचे जीवावर उठलेत. आज देऊळघाट येथे अपघाताची घटना समोर येत आहे.या घटनेत एसटी बसने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली.तो गंभीर जखमी झाला आहे.
एम एच 40 एन 9810 क्रमांकाची बस भारधाव वेगात देऊळघाट मार्गे जात होती. दरम्यान चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगात बस चालवून एका व्यक्तीला जोरदार धडक दिली.या अपघातात सदर व्यक्ती गंभीर झाला आहे.या व्यक्तीचे नाव शेख वसीम शेख सलीम (वय 38 ) राहणार देऊळगाव घाट असे सांगण्यात येत आहे.