बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पावसाळा सुरू झाला की, नैसर्गिक आपत्ती कधी ओढवणार याचा नेम नसतो.वारंवार वीज कोसळण्याच्या घटना नैसर्गिक दुर्घटनांपैकी सर्वात धोकादायक आहे. बुलढाणा जिल्ह्यात वादळाच्या तडाख्यात जानेवारी ते जून दरम्यान 12 जण मृत्युमुखी पडले आहे. वादळ वाऱ्याने 5,838 घरांना क्षति पोहचली तर 160 घरांची पडझड झाली आहे. या दुर्घटनेत 17 लहान – मोठी जनावरे दगावली आहेत.मे महिन्यात अवकाळी पावसामुळे 612 शेतकऱ्यांचे 228.47 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याची प्रशासकीय माहिती आहे.
मान्सुन सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमौसमी पावसाच्या काळात वीज कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात.वीज कोसळून अनेकांचा बळी जाणं ही अलीकडच्या काळात वारंवार बघायला मिळणारी दुर्घटना आहे.
पाऊस पडण्याच्या आधी आकाशात ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरु असते. त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेत मजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडतात. बुलढाणा जिल्ह्यात वादळाच्या तडाख्याने अनेकांचा संसार उध्वस्त केला आहे. जानेवारी ते जून दरम्यान वीज पडून, झाड पडल्याने, मंदिराचा कळस कोसळून आणि मंडप पडून 12 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये 9 लोकांना शासकीय मदत मिळाली तर 3 लोकांना मदत मिळणे बाकी आहे. वादळी पावसाने जिल्ह्यात थैमान घालून तब्बल 5,838 घरांचे अंशतः नुकसान घरांची पूर्णता हानी झाली आहे.वादळाचा तडाखा पशुधनालाही बसला असून, यामध्ये लहान मोठ्या 17 जनावरांचा जीव गेला. शेतकरी देखील संकटात सापडला. मे महिन्यात 612 शेतकऱ्यांचे 228.47 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान
वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते. शिवाय जिल्हा प्रशासनाने देखील यंत्रणा राबवून उपाययोजना करणे गरजेचे आहे.