spot_img
spot_img

अर्थऋषींच्या स्मृतींना उजाळा! स्व.डॉ.मनमोहन सिंगजींनी घेतली होती विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्या बाबत बैठक! – माजी आमदार विजयराज शिंदे भावूक होऊन म्हणालेत…

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे वयाच्या ९२ व्या वर्षी गुरुवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थऋषी गमावला आहे. त्यांनी विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्या बाबत आढावा बैठक घेतली होती.

या बैठकीचा साक्षीदार म्हणून माजी आमदार विजयराज शिंदे उपस्थित होते. त्यांनी या आठवणीला उजळा देत,त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.विदर्भात होणाऱ्या वाढत्या शेतकरी आत्महत्ये बाबत सन – २००५-०६ दरम्यान तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी विदर्भातील आमदार व खासदार यांच्या समवेत आढावा बैठक घेतली होती.या निमित्ताने त्यांच्या समवेत भेटीचा योग आला होता असे माजी आमदार शिंदे यांनी म्हटले.आज त्यांच्या दुःखद निधनाने या आठवणीस उजाळा मिळाला. देशाने आज मोठा अर्थशास्त्रज्ञ गमविल्याची भावना प्रतीत होत आहे. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली देखील शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

टीम ‘हॅलो बुलडाणा’ कडून अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!