बुलढाणा (हॅलो बुलडाणा) खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी आज नागपूर येथे मंत्रीपदाची शपथ घेतली. सायंकाळी 5 वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते त्यांना मंत्रिपदाचा मान मिळाला आहे
आ. फुंडकर हे तिसऱ्यांदा खामगाव मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. त्यांच्या सक्रिय राजकीय वाटचालीत त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. लोकांच्या समस्यांवर तत्परतेने लक्ष देण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेचे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. विकासाचा ध्यास घेऊन काम करण्याचे वचन त्यांनी यावेळी दिले. फुंडकर यांचे मंत्रीपद निश्चित झाल्यामुळे खामगावसह जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समर्थकांनी फटाके फोडून आणि जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला.
फुंडकर यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे जिल्ह्याचा मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.