spot_img
spot_img

‘गोड साखर कारखान्याची कडू कहानी!’ -मृत्यूशय्येवरील जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे अवशेष भंगारात!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून, आता या कारखान्याचे अवशेष भंगारात विक्री केल्या जात आहे.कारखाना पूर्ववत करणे तर सोडा, आता कारखान्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.दरम्यान उत्पादक शेतकरी संताप व्यक्त करीत असून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

सहकार महर्षी स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख यांनी 1967 साली सहकाराची मुहूर्तमेढ रोवत राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव देऊन जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.1990 सालापर्यंत या कारखान्याने शेतकऱ्याला समृद्ध केले.
परंतु नंतर राजकारणामुळे हा कारखान्याला घरघर लागली होती.त्यावेळी डबघाईस आलेल्या या साखर कारखान्याला डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उभारी दिली.दरम्यान पुढे संघटनांच्या आंदोलनामुळे कारखाना बंद पडला.शासनाने तो ताब्यात घेतला.विक्रीला काढला.शेतकऱ्यांचा याला प्रचंड विरोध होता.काही खाजगी कंपनीला हा कारखाना चालवण्यासाठी देण्यात आला होता.परंतु शासनाने पुन्हा ताब्यात घेऊन एकाला या वर्षात काम करण्यासाठी का दिला.दोन महिन्यात कारखान्याची काम बंद पडली असून या कारखान्याची अवशेष भंगारात विकल्या जात आहे.या कारखान्याला नवसंजीवनी देण्यात यावी,अन्यथा शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत आणि मोठे जन आंदोलन उभे होईल असा शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!