बुलढाणा (हॅलो बुलडाणा) धर्मवीर युथ फाऊंडेशनचा जिल्हा उपसंघटक कार्तिक सुभाष पवार यांनी आपला वाढदिवस एक अनोखी सामाजिक जबाबदारी म्हणून धाड नाका परिसरातील मूकबधिर मतिमंद विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाला आमदार संजय गायकवाड यांच्या आदर्श विचारांचा तसेच मृत्युंजय गायकवाड आणि पृथ्वीराज गायकवाड यांची समर्थ साथ होती आणि आई वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून.
कार्तिक सुभाष पवार याने वाढदिवसाचा आनंद मित्रपरिवारासोबत केवळ साजरा न करता, समाजातील विशेष मुलांना आनंद देण्याचा निर्णय घेतला. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना केक, खाद्यपदार्थ आणि शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. त्यांच्या या कार्यातून सामाजिक बांधिलकी आणि सहानुभूतीचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.
या अनोख्या उपक्रमामुळे परिसरातील लोकांनीही कार्तिक पवार यांचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जोपासत आपला विशेष दिवस मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत साजरा करून त्यांनी युवकांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे.