देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा) देऊळगाव मही येथील प्रसाद हॉटेल समोर उभे असलेल्या एका इसमाला एका मारुती अल्टो गाडीच्या चालकाने भरधाव गाडी चालवून उडविल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोहर धनाजी इंगळे रा. मंगरूळपीर जिल्हा वाशिम असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक मनोहर इंगळे हे देऊळगाव मही येथील प्रसाद हॉटेल समोर उभे होते.दरम्यान देऊळगाव राजा कडून येणाऱ्या मारुती अल्टो क्रमांक एम एच 19 बी जे 3261 या वाहनाच्या चालकाने निष्काळजीपणा व भरधाव वेगाने वाहन चालून मनोहर इंगळे यांना धडक दिली.या अपघातात ते गंभीर जखमी झाले असता त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान मारुती चालकाविरुद्ध कलम 281,125 (b )106 (1) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,आरोपी चालक फरार आहे. पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.