spot_img
spot_img

💥विशेष पॉलिटिक्स ! मशाल की धनुष्यबाण? साडेपाच वाजेपर्यंत 57.90 मतदानाची टक्केवारी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा विधानसभा निवडणूक क्षेत्रात निवडणूक शांततेत पार पडली असून आत्तापर्यंत आलेली आकडेवारी अशी आहे की,57.90 ही मतदानाची टक्केवारी आहे.ही आकडेवारी कमी जास्त होऊ शकते.धनुष्यबाण आणि मशाल यामध्ये तुल्यबळ लढत असून कोण जिंकणार हे दोन दिवसानंतर कळेल हे मात्र निश्चित आहे.
जिल्ह्यातील सातही मतदार संघात मतदानाची टक्केवारी समाधानकारक नाही.विकास कामे केली नसल्याने मतदान मध्ये प्रचंड नाराजी आहे.बुलढाणा 57.90% तर चिखलीमध्ये 62.29% आणि जळगाव जामोद येथे 63. 32 टक्के आणि खामगाव येथे 67.31% तसेच मलकापूर येथे 61. 85% मेहकर येथे 64.76 टक्के तरसिंदखेडराजा येथे 62.55% इतके मतदान झाले आहे.परंतु बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण यांचा सामना चांगलाच रंगात आला.हॅलो बुलढाणा चे प्रतिनिधी मतदान केंद्रावर निरीक्षण करीत असताना असे आढळून आले की, संजय गायकवाड आणि जयश्रीताई शेळके याची लढत असून धनुष्यबाणावर मशाल प्रकाश पडणार असल्याचे दिसून येत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!