सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा) सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात काका विरुद्ध पूतणीचा सामना रंगत आहे.काका डॉक्टर राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी शरद पवार गटातून तर पुतणी गायत्री शिंगणे बॅट या निशाणीवर निवडणूक लढविण्यासाठी आमने-सामने उभे ठाकले आहेत. यंदा गायत्री शिंगणे निवडणुकीत बॅटीने गगन भेदी मताधिक्याचा चेंडू टोलविणार असल्याचा राजकीय अंदाज आहे.दरम्यान स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांच्या पत्नी बीडीसीसी बँक बुलढाणाच्या माजी अध्यक्ष प्रभावतीताई भास्करराव शिंगणे यांनी एका पत्रकातून गायत्री शिंगणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांच्या पत्नी बीडीसीसी बँक बुलढाणाच्या माजी अध्यक्ष प्रभावतीताई भास्करराव शिंगणे
यांनी पत्रकात म्हटले आहे की, सहकारमहर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांचा समर्थ वारसा चालविणारी गायत्री शिंगणे मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघातून निवडणूक लढवीत आहे.परंतु ही निवडणूक नसून परिवर्तनाची लढाई आहे.मतदार संघाची परिस्थिती गंभीर झालेली असून,ही परिस्थिती बदलविण्यासाठी स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांच्याप्रमाणेच गायत्री शिंगणे ही विकासाची क्रांती घडवून आणेल असा माझा विश्वास आहे.त्यामुळे गायत्री शिंदे यांना मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन प्रभावतीताई भास्करराव शिंगणे यांनी पत्रकातून केले आहे.