बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका घटनेतील पाचव्या मजल्यावर लागलेली आग जीवाची बाजी लावून माळा चढून विझवली व अग्रवाल कुटुंबीयांचे प्राण वाचविल्याचे वक्तव्य येथील डॉ. दीपक सीताराम लद्धड यांनी काल एका जनसंवाद कार्यक्रमात केले होते.परंतु हा डॉ. लबाड लध्दड यांचे विधान अत्यंत खोटे असून डॉक्टरने राजकारणात पडायला नको होते पडलेच तर पूर्ण माहिती घ्यावी केवळ भीतीपोटी आमदाराची स्तुती करणे संयुक्तिक नाही,अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेसचे दत्ता काकस यांनी दिली असून डॉ. लद्धड यांचा निषेध व्यक्त केला आहे.दरम्यान आमदार गायकवाड आणि दत्ता काकास यांचे वाद सर्वश्रूत असल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होत असते.आता
ती पाचव्या माळ्यावरची आग तर विझली परंतु ‘ये आग कब बुझेगी?’ असे म्हणण्याचे कारण की,काकस यांच्या प्रतिक्रियेवर गायकवाड यांची प्रतिक्रिया काय उमटते? याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
बुलढाण्यात काल जनसंवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात व्यापारी,सेवानिवृत्त कर्मचारी, वकील,डॉक्टर मंडळी उपस्थित होती.यावेळी येथील प्रतिष्ठित डॉ.दीपक सीताराम लद्धड यांच्या हाती माईक आला असता,त्यांनी आमदार संजय गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी खूप विकास केला आहे.तसेच ते सामाजिक न्याया साठी तत्पर असतात.एका आग लागल्याच्या घटनेत त्यांनी पाचव्या माळ्यावर चढून जीवाची बाजी लावून अग्रवाल कुटुंबीयांचे प्राण वाचविले.जिल्ह्याचा स्वर्ग करायचा असेल तर गायकवाड यांना निवडून आणा अन्यथा नरक यातना भोगाव्या लागतील असेही डॉ. दिपक लद्धड म्हणाले.परंतु त्यांच्या या विधानावर दत्ता काकस यांनी आक्षेप घेतला आहे.ते म्हणाले की,इतक्या दिवसापासून डॉ. लद्धड हे बुलढाण्यात राहतात.त्यांनी पूर्ण माहिती घेऊन वक्तव्य करायला पाहिजे.तसे तर त्यांनी रुग्णांचे प्राण वाचवण्याची सेवा म्हणून डॉक्टरकीच केली पाहिजे.
राजकारणात विनाकारण पडू नये.डॉकटरांचा मी आदर करतो परंतु कुठल्याही खोटारड्या व्यक्तीला प्रसिद्धी देणे व त्याची स्तुती करणे चुकीचे आहे.डॉ. लद्धड स्वतः दिशाभूल झालेले असून लोकांचीही त्यांनी दिशाभूल केली आहे.सदर पाचव्या माळ्यावर आग लागल्याची घटना घडली होती तेव्हा सर्वप्रथम जीवाची भाजी मी लावली होती आणिअग्रवाल कुटुंबीयांचे प्राण वाचविले होते.या संदर्भात नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांनी नगरपालिकेत माझा सन्मान देखील केला होता.माझे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी देखील देण्यात आले होते.परंतु डॉ.दीपक लद्धड लबाड बोलत असल्याचा आरोप दत्ता काकास यांनी वृत्तपत्रातील कात्रणे दाखवून पुरावा देत केला आहे.त्यामुळे डॉ. लद्धड यांचा खोटेपणा उघडा पडला आहे. दरम्यान डॉ. लद्धड यांनी कोविड काळात रेमडीसीवीर इंजेक्शन तिप्पट भावात विकून मृतकांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले! रेमडेसिव्हीर इंजेक्शन ऑफ सलाईनचे पाणी भरल्याचा प्रकार लद्धड हॉस्पिटलमध्ये उघड झाला होता.शिवाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.अशा खोट्या माणसाने खोट्या आमदारांची स्तुती करून त्यांना धाडसी म्हणणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त होत आहे.
काय म्हणाले दत्ता काकास पहा
https://www.facebook.com/share/p/1Dne9MJ9n1/