चिखली (हॅलो बुलडाणा) होवू घातलेल्या विधानसभेच्या माध्यमातून सत्तेचा दुरूपयोग करणार्या केंद्रातील व राज्यातील भाजपाच्या सत्ताधिकार्यांना धडा शिकविण्याकरिता येत्या ता. 20 तारखेला मविआ ला प्रचंड मताधिक्य देवून निकालातून बाद करीत केंद्रात कुबड्या घेवून सरकार स्थापन करणार्यांना हद्दपार करण्याची ही वेळ आली असून ही निवडणूक निर्णायक असल्याचे प्रतिपादन संसद सदस्य तथा राजस्थानचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज चिखली येथे मविआ चे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत केले. तर कोवीड काळात देशात जनसेवेचे उत्कृष्ट कार्य करणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणार्यांचा व शेतकरी रक्ताचा अवमान करणार्यांचा बदला येत्या 20 तारखेला मविआ च्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून घ्या असे आवाहन काँग्रेस मविआ चे उमेदवार राहुल बोंद्रे यांनी चिखली येथील विराट समुदायाला संबोधित करतांना जाफ्राबाद रोडवरील सभेतील विशालकाय प्रांगणावर केले. यावेळी उपस्थित मविआ च्या कुणाल चौधरी, प्रा. नरेंद्र खेडेकर, माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर, जयश्रीताई शेळके, धृपदराव सावळे, राणा दिलीपकुमार, डॉ. गवई, यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित झालेल्या जनसमुदायाशी संवाद साधतांना खा. सचिन पायलट, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी चेन्नीथला, अभा काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक, माजी मंत्री अनिस अहमद, अखिल भारतीय बुध्दीष्ट सोसायटी इंडीयाचे चेअरमन संदेश आंबेडकर, कुणाल चौधरी, शेरा भैय्या, रिपाईचे डॉ.गवई, शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, अॅड.गणेश पाटील, विजय अंभोरे, एआयसीचे हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, पक्षनिरीक्षक संदीप मंगरूळ, आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर, धृपदराव सावळे, हरिष रावळ यांच्यासह मविआ चे उमेदवार राहुल बोंद्रे, अॅड. जयश्रीताई शेळके, डॉ. स्वातीताई वाकेकर, राणा दिलीपकुमार सानंदा, राजेश एकडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अन् राहुल गांधींनी व्यक्त केली दिलगिरी….
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संविधान बचाव सह काँग्रेस पक्षाला बळकटी देणारे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची बुलंद तोफ आज चिखलीत ता. 12 नोव्हेंबर रोजी धडाडणार होती मात्र विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वेळेवर सभा रद्द झाल्यावर खा. राहुल गांधी यांनी जनतेची सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे.
शेतकर्यांना देशोधडीला लावणार्यांना घरी पाठवा : मुकूल वासनिक
केंद्र व राज्यातील शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी वर्गावर आर्थीक संकट कोसळल्याने मेटाकुटीस आला आहे. तर राज्यातील उद्योग धंदे परराज्यात नेवून महराष्ट्रातील बेरोजगाराची कुर्हाड चालविणार्यांच्या भुलथापांना बळी न पडता राज्यातील सत्ता उलटवुन टाकण्यात बुलडाणा जिल्हयाचा सिंहाचा वाटा असायलाच हवा, त्याचबरोबर महाराष्ट्राशी गद्यारी करून महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना प्रचंड मताधिक्य देवुन विधानसभेत पाठवित गद्यारांना धडा शिकवा असे आवाहन अभाकॉँचे महासचिव खासदार मुकूल वासनिक यांनी चिखली येथील जाहीर सभेत केले.
भाजपाच्या भूलथापांना बळी न पडता राहुल बोंद्रेंना विजयी करा : माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
गेल्या 10 वर्षांपासून मोदी सरकारने शेतकर्यांच्या तोंडाची पाने पुसली असून सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांना कवडीमोल भाव दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्याकरिता राहुल बोंद्रें यांना विजयी करा असे आवाहन माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावेळी केले.
भारत देशाचा कारभार संविधानावरच : डॉ.संदेश आंबेडकर
हिंदु धर्मीय गीतेवर, मुस्लीम धर्मीय कुराणावर चालतो त्याचप्रमाणे भारत देश हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधावर चालतो, आणि जाती,धर्म,पंथात विष पेरून भांडणे लावणार्या तसेच संविधानाला नष्ट करू पाहणार्या मनुवादयांना संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आंबेडकरी जनतेने राज्यातील सरकार उलथुन टाकण्याकरीता राहुल बोंद्रे यांच्या पंजा या निशाणीला प्रचंड मताधिक्य देवुन बळकटी देण्याचे आवाहन अखिल भारतीय बुध्दीष्ट सोसायटी इंडीयाचे चेअरमन संदेश आंबेडकर यांनी केले.
येथील जाफ्राबाद रोडवरील पार पडलेल्या सभेकरिता चिखली विधानसभा मतदारसंघासह बुलडाणा, जळगांव, अकोला, वाशिम, जालना जिल्ह्यातून प्रचंड जनसागर राहुल गांधींच्या जाहीर सभेकरिता उलटला होता. या सभेचे संचलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्यामभाऊ उमाळकर तर आभार रिजवान सौदागर यांनी केले.