मेहकर (हॅलो बुलढाणा) एक एक मत दहा हजार रुपयाला विकले जाण्याची शक्यता आहे. कारण मला माहिती मिळाली की महायुतीकडून कुठे कुठे चाळीस कोटी रुपये आलेत.मेहकरात देखील चाळीस कोटी रुपये आले असून त्यांनी पोलिसांना आवाहन देखील केले आहे.ते म्हणाले की पोलिसांनो धाडी टाकाल का? मी यादी देतो ..माझे म्हणणे आहे की धाडी टाकू नका हा पैसा वाटून खा ! खिशात घालून मोकळे व्हा! असे थेट आवाहन ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.उद्याच्या पिढीचे अधिकार कायम ठेवायचे असेल तर वंचितला मत द्या असे ही ते म्हणाले.ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज एका सभेत केलेले भाष्य केले आहे.