चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे यांनी दि. ९ नोव्हेंबर रोजी आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला.
चिखली विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय नेतृत्व राहूल बोंद्रे यांना पाठिंबा जाहीर करताना संजय वाकोडे म्हणाले की,दलित पँथर च्या माध्यमातून सुरू झालेले माझे कार्य रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आठवले गटात विदर्भ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहीलो. समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी सदैव कार्यरत राहिलो. मात्र,भाजप सरकार च्या कार्यकाळात सामान्य कार्यकर्त्याला कायम डावलले गेले. महायुतीच्या कार्यकालात बहूसंख्य बहुजन समाजाला वेठीस धरण्याचे काम करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेतृत्वास म्हणजेच राहूल बोंद्रे यांना आपले बहुमुल्य मत देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
यावेळी उपस्थितांमध्ये हुसेन कुरेशी, भारतभाऊ झीने, विश्वासराव गवई,शिवाजीराव नरवाडे, रमेश साळवे,विनोद खंडाळकर,शंकरराव जूमळे, रामदास वैष्णव, शेख इब्राहिम, ताहेर बागबान,अरबाज पटेल,शेख अन्सार,मन्नान टेलर, सौरव भालेराव, भीमराव आराख,मधूकर बोर्डे, अशोकराव गवई, सुधाकर हिवाळे, सुनील हिवाळे, शेख हुसेन,सिद्धार्थ रगळे,खनसरे भाऊ हे उपस्थित होते.