चिखली (हॅलो बुलडाणा) जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे जिल्हाभरातील अनेकांचे लक्ष्य लागून आहे. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर चिखली विधानसभा मतदारसंघाचे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत वंचितच्या अशोक सुरडकर यांच्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांची व्रजमुठ बांधण्यात राहुल भाऊ बोंद्रे कमालीचे यशस्वी झाले आहे. भाजपच्या मताच्या धुव्रीकरणाच्या व्यूहनितीला राहुल भाऊ बोंद्रे यांनी हाणून पाडल्याने काँग्रेसचे पारडे जड असल्याच्या भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त केल्या जात आहे.
काँग्रेसचे एकगठ्ठा मतदान फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून वंचितचा तगडा उमेदवार उभा राहावा यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केल्या गेले. मात्र भाजपाला हवा तो उमेदवार वंचितने न दिल्याने समविचारी मतांची गोळाबेरीज करण्यात राहुल बोंद्रे वरचढ ठरले. एमआयएम पक्षाने उमेदवारच न देता आपली ताकद काँग्रेसच्या पाठिमागे उभी केल्याने त्याचाही मोठ्या प्रमाणात फायदा काँग्रेसला होणार असल्याचे सर्वश्रुत आहे. तर सतिश गवई, नरहरी गवई यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपची मतविभाजणाची गणिते बिघडल्याचे बोलल्या जात आहे. महायुतीत घटकपक्ष असणाऱ्या रिपब्लीकन पार्टी ऑफ आठवले गटाचे नरहरी गवई यांच्यावर खुद्द रामदास आठवले यांच्यामार्फत दबाव आणून अर्ज कायम ठेवण्याचे सांगण्यात आले होते. मात्र भय आणि भ्रष्टाचारमुक्तीच्या लढाईत सहभागी होत त्यांनी काँग्रेसच्या राहुल भाऊ बोंद्रे यांच्यासाठी अर्ज मागे घेतल्याच्या चर्चा जोर धरत आहे. एकंदरीतच समविचारी पक्षाची व्रजमुठ बांधण्यात राहुल भाऊ बोंद्रे वरचढ ठरल्याचे पाहायला मिळत आहे.
मतदारसंघाशी सतत ३५ वर्षांपासून राहुल भाऊ बोंदे यांची नाळ कायम!
विश्वास ठेवा बदल होणार हे बीद्र घेऊन राहुल भाऊ बोंद्रे यांनी भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या चिखली मतदारसंघात काँग्रेसचा हात घराघरात पोहोचत परिवर्तन घडवून आणले. दोन वेळा आमदार राहिलेल्या राहुल भाऊ बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास घडवून आणला. कायम ३५ वर्षांपासून लोकांशी संपर्कात असणे, लहान – मोठ्यांच्या सुख दु: खात धावून जाणे या गुणांसोबतच शांत संयमी असणारा राहुल भाऊ बोंद्रे यांचा स्वभाव विशेष वाखण्याजोगा ठरतो. लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते तयार केली. त्यांनी राबविलेल्या गरुडझेप प्रकल्पाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली होती. तर भगीरथ जलसंजीवनी प्रकल्प असो की इतर कोट्यावधी रुपयांची नागरिविकासासोबतच पायाभुत सुविधांची कामे याने मतदारसंघाचा चेहारामोहरा बदलून गेला होता, हे विशेष..!
भाजपच्या हिंदुत्वादी मताचे मनसे विश्व हिंदुपरिषदेमुळे मोठ्या प्रमाणात धुव्रीकरण!
मनसेने एकला चलो चा नारा दिल्याने पक्षाकडून गणेश बरबडे चिखली विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. तर विश्व हिंदु परिषदेचे अपक्ष उमेदवार तसेच तीन ते चार मराठा उमेदवार असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. चिखली मतदारसंघात मनसेच्या गावपातळीवरील शाखा दखलपात्र असल्याने भाजपचे परंपरागत मतदान मनसेच्या पारड्यात पडणार आहे. तसेच कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा मतदार हा विश्वहिंदु परिषदेच्या पाठिशी उभा असल्याचे दिसून येते. तर आ. श्वेता महाले यांच्या मराठा समाजातून तीन ते चार मराठा उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. परिणामी काँग्रेस आपला मतदारवर्ग कायम राखण्यात यशस्वी झाल्याने काँग्रेसची वाट विजयाच्या दिशेने सुकर झाल्याचे बोलल्या जात आहे.
क्रमशः