चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली विधनसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल सिध्दविनाय बोंद्रे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी आपल्या झंझावाती दौऱ्यादरम्यान चिखली शहरातील प्रचार कार्यालयास भेट दिली व उपस्थितांना संबोधीत केले.
प्रचार सभसे संबोधीत करतांना मा.मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ व महायुतीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ याची तुलना केली असता जनमाणसांना महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील ठळक घडामोडींचा आजही प्रत्यय येतो. नेमका त्याच काळात कोरोना सारखी महाभयंकर महामारी आली असतांना तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने सक्षमपणे त्याचा सामना केला. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती मजबुत होती मात्र महायुतीने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती डबघाईस आणुन राज्यातील मोठमोठे उद्योग गुजरातला नेऊन मराठी माणसावर अन्याय केला आहे. आगामी कार्यकाळात महाविकास आघाडी गरीबांच्या शिक्षणावर भर देईल तसेच मुलींसारखेच मुलांनाही मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न राहील तसेच नोकरदार वर्गांना निवृत्तीनंतर त्याचे जिवन सुसह्य व्हावे त्यासाठी पेंशन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न राहील. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात लुटारुंच्या टोळ्यांनी जे थैमान घातले आहे त्याला या निवडणुकीच्या माध्यमातुन आळा घालण्याचे काम मतदार बंधुंनी करावयाचे आहे. चिखली विधनसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल सिध्दविनायक बोंद्रे हे अत्यंत सक्षम व सकारात्मक नेतृत्व असुन या नेतृत्वास येत्या 20 नाव्हेंबर रोजी त्यांच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबुन त्यांना भरघोस मतांनी विजयी करुन चिखली मतदारसंघासह महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करुया.
या वेळी शिवसेना उबाठा चे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हाअध्यक्षा सौ.रेखाताई खेडेकर,हाजी दादू सेठ, जि.प.सदस्या डॉ.सौ.ज्योतीताई खेडेकर, वृषालीताई बोंद्रे, कुणाल बोंद्रे, श्रीराम झारे, मो.आसीफ मो.शरीफ, संजय गाडेकर, डॉ.निलेश गावंडे, सचिन बोंद्रे यांच्यासह महाविकास आघाडी अंतर्गत पक्षातील विविध मान्यवर पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारोच्या बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.