चिखली (हॅलो बुलडाणा) मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या दरम्यान, संध्याकाळच्या सत्रात धाड येथे झालेल्या रॅलीत राहुल बोन्द्रे पोहोचले. त्यांच्या आगमनाने परिसरात मोठा उत्साह संचारला होता. स्थानिक सहकारी, कार्यकर्ते, व पदाधिकारी यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी बोन्द्रे यांना अक्षरशः खांद्यावर उचलून त्यांच्या संघर्षाची आणि कष्टाची कदर केली.
राहुल बोन्द्रेंनी यावेळी आपल्या भाषणात जनतेच्या प्रश्नांना हाताळण्याची व त्यांच्यासाठी झटण्याची तयारी दर्शवली. भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध आपला लढा सुरूच ठेवण्याचे त्यांनी आश्वासन दिले. धाडवासियांच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाखवलेल्या प्रेमामुळे राहुल बोन्द्रे भारावून गेले होते.
जनतेच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने राहुल बोन्द्रेंच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. धाड येथील लोकांना त्यांच्यावर असलेला विश्वास आणि जनतेच्या आशीर्वादामुळे त्यांच्या संघर्षाला निश्चित बळ मिळणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या रॅलीमुळे मतदारसंघात राहुल बोन्द्रेंच्या पक्षाच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.
जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मिळाल्यामुळे राहुल बोन्द्रेंना या निवडणुकीत विजय मिळवण्याची खात्री आहे.