spot_img
spot_img

दिव्य संकल्प रेल्वे यात्रेचा भक्तिमय प्रवास होणार सुकर! -यात्रेसाठी बुलडाणा अर्बन देणार कर्ज सुविधा ! -राधेश्याम चांडक यांची घोषणा !

बुलडाणा (हॅलो बुलढाणा) सद्भावना सेवा समिती बुलढाणा द्वारा दि. 8 नोव्हेबर 2024 ला मथुरा, वृदावन, अयोध्या, वाराणशी, गंगासागर व जगन्नाथपुरी या तीर्थ स्थळासाठी दिव्य संकल्प स्पेशल रेल्वे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 नोव्हेंबर 2024 ला यात्रेचे समापन होईल.अकोला ते अकोला अशी 10 दिवसाची स्पेशल रल्वे यात्रा आहे. वातानुकलित शयन यान (A.C. बर्थ) करीता रू.32000/- सहयोग शुल्क आहे. या मध्ये निवास, भोजन व प्रवास व स्टिमर व्यवस्था समाविष्ट आहे. आचार संहिता मुळे काही सीट्स खाली झाल्या आहेत, ज्या भाविकांना सहभागी व्हायचे असेल परंतु पैशाची अडचण असेल त्यांना बुलढाणा अर्बन द्वारा रू.15000 पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. सीट बुक करण्यासाठी चंपालाल शर्मा मो.9822222206, किंवा प्रा.प्रकाशचंद्र पाठक मो. 9881939883 यांच्याशी संपर्क साधावा . दिव्य संकल्प रेल्वे यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितिचे अध्यक्ष श्री राधेश्याम चांडक यानी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!