बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवाळीच्या फटक्यांच्या आवाजात राजकीय फटाके वाजवील्या जात आहे. बंडखोरांनी तर आधीच वात लावली असून फटाका कोणता डेसिबल पर्यंत आवाज चढवू शकतो ही येणारी वेळ सांगणार आहे.पक्ष उमेदवारी दाखल केलेले भाजपाचे लोकसभा संपर्कप्रमुख विजयराज शिंदे यांनी दिवाळीला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची शुभेच्छा भेट घेतली.दरम्यान त्यांनी राजकीय चर्चा सुद्धा केली त्यामुळे त्यांनी काय चर्चा केली असावी ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
भाजपा लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजय गायकवाड विरोधात बंड पुकारत भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला होता.पण तो पडताळणीत बाद झाला असला तरी, त्यांचा अपक्ष अर्ज कायम आहे. दरम्यान त्यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीसांकडे प्रत्यक्ष मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे. ते मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेऊन आले. ना.फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली असून याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. काल दिवाळीनिमित्त शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांची विजयराज शिंदे यांनी भेट घेतली.यावेळी त्यांनी त्यांच्याशी राजकीय चर्चा देखील केली आहे. बंदद्वार चर्चेत काय झाले असावे?आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांना काय सांगितले असावे?
याची उत्सुकता अनेकांना आहे.