बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील वृंदावन नगरामध्ये मोहीते यांच्या घरात गॅससिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आताच समोर आली आहे. या घटनेत एक वृद्ध महिला पन्नास टक्के भाजल्याने त्यांना उपचारार्थ निकाळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.या घटनेत मोहिते यांच्या घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान दिवाळीचा सण असल्याने स्फोटक पदार्थापासून सावध रहाणे गरजेचे आहे.आग लागण्याच्या घटना दिवाळी घडत असतात.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ‘हॅलो बुलढाणा’ करीत आहे.
▪️जनहितार्थ :
अशी काही घटना घडल्यास ताबडतोब क्षेत्र सोडा आणि प्रत्येकजण हानीपासून दूर असल्याचे सुनिश्चित करा. इतरांना सावध करा ओरडून बाहेर पडण्यासाठी शेजाऱ्यांनाही सावध करा. मदतीसाठी कॉल करा अग्निशमन विभाग आणि गॅस पुरवठादाराला सुरक्षित अंतरावरून कॉल करा.











