बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज अनेक उमेदवार नामांकन दाखल करत आहेत परंतु मेहकर विधानसभा मतदारसंघात डॉ.ऋतुजा चव्हाण यांची मोठी चर्चा आहे. तर आज त्या नामांकन दाखल करणार असून फायर ब्रँड शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मेहेकरात तोफ धडाडणार असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांना शेतकरी चळवळीचे भक्कम बळ मिळाले असल्याने त्यांच्या विजयाची शेतकऱ्यांनी ग्वाही दिली आहे.
आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यानिमित्ताने शेतकरी नेते तथा शेतकरी संघटना (क्रांतीकारी)चे संस्थापक रविकांत तुपकर हे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत. तुपकरांची जाहीर सभा होणार असून, शक्ती प्रदर्शन होणार आहे.