बुलढाणा (हॅलो बुलढाणा) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात निष्ठापूर्वक कार्य केलेल्या प्राध्यापक सदानंद माळी यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीचा मार्ग अवलंबिला असून त्यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित ची उमेदवारी घोषित केली आहे.
आज जाहीर झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार यादीमध्ये सदानंद माळी यांचे नाव आहे.त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जयश्रीताई शेळके आणि वंचित कडून सदानंद माळी या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.अजूनही उमेदवार मैदानात उतरणार असून याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.