spot_img
spot_img

आज अर्ज स्विकृती ! -निवडणूक निर्णय अधिकारी खडसे काय म्हणाले ?

देऊळगाव (हॅलो बुलढाणा) केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 ला जाहिर केला आहे, विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 24- सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघामध्ये दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पासून निवडणूकिचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.मा. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे,दि. 22 ऑक्टोंबर 2024 पासून निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे,
दि. 29 ऑक्टोंबर 2024 उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून, दि. 30 ऑक्टोबर 2024 ला अर्जांची छानणी होणार आहे,दि. 4 नोव्हेंबर 2024 अर्ज माघारी घेण्याची मुदत पर्यंत असेल. अर्ज माघारी घेतल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे,
दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.निवडणूक उमेदवारांचे अर्ज हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये तहसील कार्यालय येथे उपलब्ध होणारा असून, मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या तहसील कार्यालय येथील दालनामध्ये अर्ज स्वीकृती होणार आहे. अर्ज स्वीकृती साठी उमेदवारा सोबत फक्त 5 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे असे मा. खडसे यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!