बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अद्यापही बुलढाणा विधानसभेची जागा डिक्लेअर केली नाही.परंतु ही जागा खेचण्यामागे अनेक जण लागले आहेत.महत्वाचे म्हणजे ही जागा जर काँग्रेस प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांना मिळाली तर त्या जिंकून येऊ शकतात,असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी नेते रविकांत तुपकर, जालिंदर बुधवत आग्रही असले तरी उद्धव ठाकरे यांनी जयश्रीताई शेळके यांना तिकीट दिल्यास त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात अमुलाग्र बदल घडवतील,असा विश्वास व्यक्त होतोय!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 146882 महिला मतदार आहेत. त्यांना आकर्षित करण्याचे काम जयश्रीताई करू शकतात. कारण जयश्रीताई यांनी दिशा बचत गट चळवळीच्या माध्यमातून अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले.जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजनांची कामे मार्गी लावली होती.विशेष म्हणजे ताई प्रसंगी न्याय मिळविण्यासाठीवाघीण देखील होतात. त्यांनी अनेक यशस्वी आंदोलने केली.
जयश्री शेळके यांचा राजकारणात गाजावाजा असून त्यांनाच तिकीट मिळावे,अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.उद्धव ठाकरे गटाकडून जालिंदर बुधवत यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळेल असा दावा त्यांचे समर्थकांनी केला आहे.तर शेतकरी येथे रविकांत तूपकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने आणि त्यांनी लोकसभेत अडीच लाख मत मिळवल्याने स्वतः उद्धव ठाकरे देखील बुलढाणा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी पेचात पडले आहेत. उद्धव सेनेच्या उमेदवारी यादीत जयश्री ताईंचे नाव क्रमांक एक वर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय समर्थकांनी सांगितले आहे.