बुलढाणा (हॅलो बुलढाणा) केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव सह उपसंचालक अकोला कमलेश भंडारी व डायरेक्टर पुणे यांना ऑगस्ट महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात विभागीय चौकशीत सिद्ध झालेले दोषी यांनी करोडो रुपये भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे बुलडाणा बहुचर्चित भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे यांची चौकशी करण्याचे पत्र देण्यात आले होते.परंतु अद्यापही हे प्रकरण थंडबस्त्यात असून,अकोलाचे आरोग्य उपसंचालक डॉ.कमलेश भंडारी हे देखील मूग गिळून आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा अंतर्गत राजरोपपणे शासकिय वैद्यकिय खरेदी
साहित्यात झालेल्या कोट्यावधी रकमेच्या व दिव्यांग प्रमाणपत्राच्या वितरणांत झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत आरोग्य केंद्रीय राज्यमंत्री यांना कायस्थ यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी पत्र दिले होते.सदर भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली होती. या पत्रात म्हटले की, शासकिय रुग्णालयात अनेक दिवसांपासून रुग्णांसाठी सर्वसाधारण जनतेच्या आरोग्याकरीता शासनाकडून मिळालेल्या वैद्यकिय साहित्यांच्या वितरणामध्ये तसेच दिव्यांग,प्रमाणपत्रांच्या वितरणामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार करुन कोट्यावधी रुपयांची अफरातफर केल्याचे स्पष्टपणे उघडकीस आलेले असून या बाबीकडे सर्व संबंधीत जबाबदार आजी व माजी जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा हे जाणीवपूर्वक डोळेझाक करून स्वतःसह इतरांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करीत आहेत.शासकिय साहित्यातील करोडो रुपयांची अफरातफर होत असल्याचे कारणावरून या बाबीस
सार्वजनिक स्वरुपात वाचा फोडण्याकरीता स्थानिक आमदार मा. संजय गावकवाड ( शिंदे गट) शिवसेना २२ बुलडाणा विधानसभा मतदारसंघ यांनी हिवाळी अधिवेशामध्ये 2023 मध्ये प्राधान्याने लक्षवेध सुचना मांडून घटनेचे गांर्भीय समजून एसीएसच्या मार्गदर्शनात
चौकशी होवून कारवाई करणाची मागणी केली आहे.सदर घटनेची वरिष्ठ स्तरावर चौकशी
करुन कारवाई करण्याचे आदेश झालेले आहे. यास सर्वस्वी जबाबदार उपसंचालक,अकोला डॉ. कमलेश भंडारी हे जबाबदार असून ते गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणाची चौकशी लांबणीवर पडत असून बुलडाणा शासकिय रुग्णालयात चालत असलेल्या भ्रष्टाचार पुन्हा जोमाने राजरोषपणे चालू आहे.मात्र सर्वसामान्य जनता भरडल्या जात आहे. व त्यांना आवश्यक त्या वैद्यकिय सेवा उपचारास मुकावे लागत असून त्यांना बाहेरुन आवश्यक ते साहित्य खरेदी करावे लागत आहे. तरी पुन्हा चौकशी होवून संबंधीतांवर जलद गतीने कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.