देऊळगाव साकरशा (हॅलो बुलढाणा/गणेश पाटील) ‘बरं झालं ! शाळेच्या 150 च्यावर विद्यार्थ्यांना पोहोचवील्यानंतर बसचे चाक झाले निकामी !’ ही बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने काल प्रकाशित करताच बुलढाणा बस व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेत मेहकर आगाराची गाडी दुरुस्तीसाठी पाठवून एसटी बसची दुरुस्ती करण्यात आली. दरम्यान 2 मेकॅनिकल सह एक कर्मचारी निलंबित होणार असल्याची अनाधिकृत माहिती मिळत आहे.
काल 19 ऑक्टोबर रोजी शाळेच्या 150 च्यावर विद्यार्थ्यांना पोहोचवील्यानंतर बसचे चाक निकामी झाले होते.सुदैवाने बस मध्ये कोणी नसल्याने संभाव्य धोका टळला. देऊळगाव साकरशा तसेच जानेफळ परिसरामध्ये असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना व मेहकर तालुक्यातील खामगाव मेहकर रोडवर असलेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडण्यासाठी आणि शाळेमधून त्यांच्या गावांमध्ये पोहोचवण्यासाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बस क्रमांक एम एच 27 सी 9314 बसचे चाक निकामी झाले होते. योगायोगाने सदर बस मध्ये विद्यार्थी नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितवास धोका झाला नाही. यासंदर्भात ‘हॅलो बुलढाणा’ने रोखठोक वृत्त प्रकाशित केल्यानंतर रात्री उशिरा साडेअकरा वाजता मेहकर आगाराची गाडी घटनास्थळी दाखल होवून सदर ना दुरुस्त एसटी बसचे चाक दुरुस्त करण्यात आले.